CONFERENCE DETAILS

MARATHI

दुसरे NAYC: तारीख लक्षात ठेवा!!

होप विश्वासी (ब्रदरन) मंडळी, भोपाळ कडून आपणास अभिवादन.

प्रभूची इच्छा झाली तर, 2025 मध्ये मंडळी म्हणून दुसरे नॅशनल ॲसेंब्ली युथ कॉन्फरन्स आयोजित करण्याची आमची इच्छा आहे.

कृपया तारीख लक्षात ठेवा 🙏🏻

1-2-3 ऑक्टोबर 2025

2015 मध्ये आम्ही पहिले नॅशनल ॲसेंब्ली युथ कॉन्फरन्स (NAYC) भोपाळ येथे आयोजित केले होते. भारतातील 22 राज्यांतून 600 तरुण पहिल्या NAYC ला उपस्थित होते.

तेव्हापासूनच आम्ही दुसऱ्या NAYC च्या आयोजनासाठी प्रार्थनेत होतो आणि प्रभूची इच्छा झाली तर 'बुधवार, 1 ऑक्टोबर ते शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025' दरम्यान दुसरे नॅशनल ॲसेंब्ली युथ कॉन्फरन्स आयोजित करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

आम्ही विश्वासाने 'दुसरे NAYC 2025' साठी प्रभुकडे पाहत आहोत, तुम्ही देखील आमच्यासोबत ह्या विषयासाठी प्रार्थना करा.

त्याच्या गौरवी सेवेत,

वडिल,

होप विश्वासी (ब्रदरन) मंडळी, भोपाळ, म. प्र.